Top News नाशिक महाराष्ट्र

“भाजप सोडून कोणीही जाणार नाही, काहीजण उगाचच वावड्या उठवतात”

नाशिक | राज्याच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनात येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री आणि आमदार अजित पवार यांनी केला होता. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

येत्या काळात अनेक लोकांचे भाजपमध्ये प्रवेश होणार आहेत. काहीजण रोज वावड्या उठवतात की भाजपचे लोक आमच्याकडं येणार आहेत. पण कोणी त्यांच्याकडे जाणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नाशिकमध्ये माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.

दरम्यान, देशाचं भविष्य हे राहुल गांधी नाही, युपीए नाही. तर, या देशाचं वर्तमान आणि भविष्य हे नरेंद्र मोदी असल्याचंही फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात उद्यापासून इतके दिवस रात्री राहणार संचारबंदी- मुख्यमंत्री

‘असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं’; राजू शेट्टींचा पंतप्रधान मोदींवर निशाण

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन

भाजपमध्ये काम केलेला माणूस इतर पक्षात रमतच नाही- चंद्रकांत पाटील

युकेमधून येणाऱ्या विमानांना 31 डिसेंबरपर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या