Top News महाराष्ट्र मुंबई

“शिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायच याचा निर्णय घ्या”

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यास आमचा केव्हाही आणि कधीही विरोध नाही. पण शिवसेनाप्रमुखांचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचं याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मंगळवारी भाजप प्रदेश कार्यालयात संघटनात्मक बैठका पार पडली. त्यानंतर फडणवीसांनी पत्रकरांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केलं.

ग्रामपंचायच निवडणुका पार पडल्यावर वीजबिल थकबाकीदारांच्या जोडण्या तोडण्याचा महावितरणचा निर्णय हा सरकारच्या विश्वासघाताचा नमुना आहे,  अशी टीका करत बिल्डरांच्या शुल्कसवलतीसाठी राज्य सरकारकडे निधी आहे पण सर्वसामान्यांच्या वीजबिल सवलतीसाठी नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.

दरम्यान, केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात महाविकास आघाडी सरकारचे आंदोलन हे ढोंगबाजी असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.

थोडक्यात बातम्या-

शेवटी जिंकलोच!… मात्र हा व्हिडीओ करोडो भारतीयांच्या काळजाची धडधड वाढवतोय

शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार

ऑस्ट्रेलियन कोचनं भारतीयांबद्दल एक वाक्य असं वापरलं, ज्यामुळे त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल

“शेतकऱ्याच्या मुलाला संधी मिळाल्यास तोही नेतृत्व सिद्ध करतोच”

“संघ एका रात्रीत उभा राहिलेला नाही, हे विराट कोहलीच्या मेहनतीचं फळ”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या