Top News महाराष्ट्र मुंबई

प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे निष्पाप बालकांचा नाहक जीव गेला- देवेंद्र फडणवीस

मुंबई | भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला होता.  याप्रकरणी अद्याप सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी प्रशासनावर टीका केली आहे.

प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे भंडारा सामान्य रूग्णालयात 10 निष्पाप बालकांचा नाहक जीव गेला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न केला गेल्याने भाजपच्यावतीने भंडारामध्ये आज सोमवारी बंद पाळण्यात आला.

मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रूपये देण्यात यावेत आणि भंडारा सामान्य रूग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी राज्य सरकारने तत्काळ आराखड्याला मंजुरी द्यावी, या मागण्याही फडणवीसांनी केल्या आहेत.

दरम्यान, काही लोकांनी आपलं कर्तव्य पार न पाडल्यामुळे, जर एखादी घटना घडली असेल तर तो सदोष मनुष्यवधच आहे. म्हणून तशाप्रकारे कारवाई व्हावी अशी जनतेची मागणी असल्याचं फडणवीसांनी बोलवून दाखवलं.

 

थोडक्यात बातम्या-

‘योगी की मौत सुनिश्चित हैं’; आपच्या आमदाराचं वक्तव्य, पाहा व्हिडीओ

ग्वाल्हेरमध्ये हिंदू महासभेने सुरू केली गोडसे ज्ञानशाळा!

“…तर त्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही”

विराट झाला ‘बाप’माणूस! विरूष्काच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन

भंडारा रुग्णालय दुर्घटनेमधील पीडित कुटुंबीयांना मोदी सरकारकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या