बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चित्रा वाघ यांच्या मॉर्फ केलेल्या फोटोवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले….

मुंबई | सध्या राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. पूजाने चव्हाणच्या आत्महत्येला शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं आहे. त्यासोबतच काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. यावरून भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट राठोडांवर आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणामध्ये चित्रा वाघ यांनी पूजाने ज्या गॅलरीमधून आत्महत्या केली त्या गॅलरीच्या पाहणीसाठी त्या स्वत: बोलत होत्या. मात्र संजय राठोड यांच्या समर्थकांनी चित्रा वाघ यांना टार्गेट केलं होतं.

चित्रा वाघ यांचा पतीसोबतचा म्हणजे फोटो एडिट करत त्या जागी संजय राठोड यांचा फोटो लावण्यात आला होता. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

सरकार दोषींवर कारवाई करीत नाही. पण आंदोलन करणार्‍या महिलांचेच अटकसत्र राबविण्यात शासनाला धन्यता वाटते. भाजपच्या महिला नेत्यांच्या छायाचित्रांशी छेडछाड करणार्‍या विकृतीवर कारवाईची तत्परता न दाखविता, केवळ आवाज दडपण्याच्या या दबावतंत्राचा आम्ही तीव्र निषेध करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरकार हे नेहमी पालकत्त्वाच्या भूमिकेत असलं पाहिजे. आमची मागणी आहे की, केवळ दबावाचे, गळचेपीचे राजकारण न करता सरकारने आधी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी. महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे असलं पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

 

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारमधील धनंजय मुंडे, राठोड यांच्यानंतर आता संजय राऊतांवर आरोप

अबब! चोरी करण्यासाठी चोराची आयडियाची कल्पना, चोरली तब्बल 400 किलो चांदी

मुलांची आता खैर नाही! पालकांना आता कळणार आपली मुले मोबाईलवर नेमकं काय पाहतात?

‘आपण भाजपमध्ये गेला नसता तर…;’अमोल मिटकरींचा चित्रा वाघ यांना टोला

गुडन्यूज! छत्रपती शिवाजी महाराजांवर हिंदीत येतोय नवा सिनेमा, ‘हा’ अभिनेता महाराजांच्या भूमिकेत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More