बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन दुसरं असूच शकत नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली होती. पवारांनी काँग्रेस पक्षाच्या अवस्थेवर भाष्य केलं होतं. शरद पवारांच्या वक्तव्याचा आधार घेऊन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस पक्षाची तुलना शरद पवारांनी उत्तर प्रदेशच्या जमीनदारांशी केली आहे. या टीकेवरून देवेंद्र फडणवीस यांनी, मला वाटत की काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन दुसर असुचं शकत नाही. आता काँग्रेस जुन्या पुण्याईवरच जगत आहे, असं देवेंद्र फडणीवस यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी काँग्रेसवर टीका करताना उत्तर प्रदेशमधील जमीदाराचं उदाहरण दिलं आहे. उत्तर प्रदेशमधील जमीदारांकडे मोठी शेती होती. मात्र सिलिंग कायदा आल्याने येथील लोकांच्या हजारो एकर जमिनी गेल्या. जमिनी गेल्या तरी त्यांची हवेली अजुन तशीच आहे. या हवेलीची दुरूस्ती करण्याची ताकद देखील आता जमीनदारांमध्ये राहिलेली नाही, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, काँग्रेसने अनेकांना जमिनी राखायला दिल्या. ज्यांना राखायला जमिनी दिल्या त्यांनीच आमच्या जमिनी चोरल्या. त्यांनीच जमिनींवर डाका टाकला. 2024 ला काँग्रेसचाच पंतप्रधान होणार, कोणाला काय बोलाचंय याचं स्वातंत्र्य लोकशाहीत आहे, असं नाना पटोले म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

औषधांची ड्रोनद्वारे होम डिलव्हरी करणारं देशातील ठरणार ‘हे’ पहिले राज्य!

राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार; अण्णा हजारेंचा आंदोलनाचा इशारा

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमाला आले तर…’; नारायण राणेंचा ‘त्या’ वक्तव्यावरून यु-टर्न!

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आगीतून फुफाट्यात! विश्वचषकाच्या तोंडावर राशिद खाननं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

रविंद्र जडेजाच्या घरी रंगला ‘राजकीय सामना’; नणंद भावजय आमने- सामने

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More