सांगली | महविकास आघाडीतील तीन नेत्यांना ईडीची नोटीस आली आहे. यामध्ये शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आली. यावर बोलतान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला आहे.
माझं असं म्हणणं आहे की चांगलं काम केलं तर कुणाला नोटीस मिळत नाही. जर चांगलं काम केलं असेल आणि कुठलीही चूक नसेल तर कुणी घाबरण्याचं कारण नाही. नीट जाऊन त्याला उत्तर देता येत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
आता मिळाली कुणाला, कुणाली नाही मिळाली, हे मला माहिती नाही. कारण मी त्यांचा प्रवक्ता नाही, असं फडणवीस म्हणाले. भाजपच्या आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप कार्यक्रमानंतर इस्लामपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर इत्यादी नेते उपस्थित होते.
थोडक्यात बातम्या-
“ईडीला आता कुणी घाबरत नाही, शरद पवार आणि ठाकरेंना नोटीस आली पुढे काय झालं?”
‘इंग्रजी विक म्हणजे….’; मराठी मुलांना अभिनेता स्वप्नील जोशीने दिला हा मोलाचा सल्ला
“कुणालाही ईडीची नोटीस मिळाली की भाजपला समोर केलं जातं”
“मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली”
प्रसिद्ध सराफी व्यावसायिक मिलिंद मराठे यांचं निधन; आत्महत्येचा केला होता प्रयत्न