Top News महाराष्ट्र मुंबई

गजानन मारणे जेलमधून सुटलाच कसा- देवेंद्र फडणवीस

मुंबई | कुख्यात गुंड गजानन मारणे सोमवारी तळोजा कारागृहातून सुटला. मारणेच्या स्वागतासाठी शेकडो समर्थक तळोजा कारागृहाच्या गेटबाहेर उपस्थित होते. त्यानंतर पुण्याकडे येताना एक्सप्रेसवरून जवळजवळ 50 गाड्यांचा ताफा एकामागोमाग पाहायला मिळाला. जेलमधून सुटल्यावर मारणेची जंगी मिरवणूक ही राज्यभर चर्चेचा विषय ठरला. मात्र यावरून विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भर दिवसा खून केलेल्या गुंडाचं महिमामंडन होणं हे अतिशय होणं चुकीचं आहे. खरतर गजानन मारणे सुटलाच कसा याचा विचार करायला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच आपल्या कायद्यामध्ये काय कमतरता राहिली की जााणीवपुर्वक सोडवण्याचा प्रयत्न केला?, याचीसुद्धा शहानिशा व्हायल हवी असं फडणवीस म्हणाले.

गुंड सुटल्यावर त्याची जर मिरवणुक निघणार असेल तर या महाराष्ट्रामध्ये आणि बंगालमध्ये काही फरक राहणार नसल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीसांच्या आधी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही या प्रकरणावरून सरकारवर टीका केली आहे. राज्यात रोज खून हल्ले बलात्काराच्या घटना तर घडतातच पण तुरुंगातून सुटका झाल्यावर एखादा नामचीन गुंड मिरवणूक काढायची हिंमत करतो. कोणीही गुंड खुलेआम दणक्यात वाढदिवस साजरे करायची हिंमत करतो. हे चांगल्या समाजासाठी लाजीरवाणं आहेच पण हा तर सरकारच्या अस्तित्वहीनतेचाही पुरावा असल्याचं म्हणच चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गजानन मारणेच्या समर्थकांनी काढलेल्या जंगी मिरवणुकीमुळे मारणेवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्याला जामीन मिळाला असून तो पुन्हा बाहेर आला आहे.

थोडक्यात बातम्या-

पत्नीने केली चौथ्या पतीची हत्या, कारण ऐकूण तुमचीही झोप उडेल!

नेत्याच्या गाडीत ड्रग्ज ठेवत रचला कट पण…; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश!

रेल्वेत आढळली बेवारस बॅग, खोलून पाहताच अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे!

धक्कादायक! तृतीयपंथीयांनी वाहतूक पोलिसाला मारहाण करत गणवेशही फाडला

15 दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर आलेल्या कुख्यात गुंड शरद मोहोळला पुन्हा अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या