बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती”

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं. आज लोकनेते, जननायक गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत या सरकारची झाली नसती, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावरुन ऑनलाईन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.

काही लोक सामान्य म्हणून जन्माला येतात. पण त्याचं कार्य असामान्य असतं. गोपीनाथ मुंडे हे त्यापैकीच एक होते. मुंडे यांना लोकनेता म्हटलं जातं. ते जननायक आणि लोकनायक बनले. नाथ्रासारख्या छोट्या गावातून येऊन त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला. मुंडेंनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेता बनवलं. त्यांच्यासोबत राज्यात आणि विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. ते नेहमी सांगायचे की सत्तेसोबत कधी समझोता केलात तर कधीही नेता बनू शकत नसल्याचं सांगत फडणवीसांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.

गोपीनाथ मुंडे यांनी मोठा काळ विरोधी पक्षात घालवला. पुढे युतीची सत्ता आली त्यात ते उपमुख्यमंत्री, गृहमंत्री बनले. त्या काळात ज्या मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत त्यांनी संपवली. गृहमंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलंच. संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात मुंडेसाहेबांना पाहायला, ऐकायला लोक यायचे. गोपीनाथ मुंडे सत्तेत असोत वा नसोत, त्यांचा एक रुबाब कायम होता. त्यांना पाहून आपली काम होतील, असा विश्वास लोकांना असल्याचं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त डाक पाकीट Postal Envelope चं अनावरण करण्यात आलं.आमच्या नेत्याचं डाक पाकीट प्रसिद्ध केल्याबद्दल केंद्र सरकारचे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.

थोडक्यात बातम्या- 

शेअर मार्केटमधील 50 रूपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ शेअरने 7 दिवसातच मिळवून दिले 100 टक्के रिटर्न 

गायिका वैशाली माडे हाती राष्ट्रवादीचं घड्याळ बांधत आता राजकारणात घालणार पिंगा

“तुझा पती माझा आहे…” असं म्हणत मुलीने आमदाराच्या सुनेवर केला हल्ला

‘माझ्या कोंबडीच्या पोटात दुखतंय’; लॉकडाऊनमध्ये बाहेर पडलेल्या व्यक्तीचं पोलिसांना उत्तर, पाह व्हिडीओ

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीनं घेतला सोशल मीडियावरून ब्रेक, पोस्ट करत दिली माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More