Top News पुणे महाराष्ट्र

“या तीन पक्षांची तोंडं तीन दिशेला आहेत, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच मोठा पक्ष”

पुणे | ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच मोठा पक्ष मोठा ठरल्याचा दावा पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीवेळी फडणवीस बोलत होते.

विरोधक खोटा दावा करत आहेत. तिघे मिळून निवडणूक लढवूनही भाजपच मोठा पक्ष ठरला आहे. राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत साडेपाच ते सहा हजार ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. तिघे एकत्र येऊनही भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सरकारने आदिवासींसाठी केलेल्या कल्याणकारी योजना बंद करण्याचा घाट सध्याचं सरकार घालत आहे. थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर आम्ही पैसे जमा करत होतो. मात्र सध्याच्या सरकारला खरेदीचा शौक आहे. कारण माल खरेदी केल्यास त्यांना माल मिळतो अशी घणाघाती टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, कल्याणकारी योजना बंद करणारे तुम्ही कोण?, असा जाब सरकारला विचारणार आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागला तरी चालेल, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात हेच राहायला हवे- यशोमती ठाकूर

‘नायक’ सिनेमाप्रमाणे ही तरूणी ‘या’ राज्याची या दिवशी होणार एक दिवसाची मुख्यमंत्री

अरे काय चाललंय काय?, महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?- चंद्रकांत पाटील

“विरोधी पक्षाने मुद्दा उचलल्याने मला वाटलं की मी मोठ्या राजकीय षडयंत्राचा बळी होत आहे”

सीरमला लागलेल्या आगीत एक हजार कोटींचं नुकसान झालं- आदर पुनावाला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या