‘हे महाराष्ट्राच बजेट की मुंबई महापालिकेचं’; अर्थसंकल्पावरून देवेंद्र फडणवीसांचं टीकास्त्र
मुंबई | महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत मांडला. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी निराशा व्यक्त केली असून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. अर्थसंकल्पानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
हा अर्थसंकल्प राज्य सरकारचा की मुंबई महापालिकेचा?, हाही प्रश्न निर्माण होतो आहे. ट्रान्सहार्बर लिंक, वांद्रे-वर्सोवा हे सारे आमच्या काळात सुरू झालेले प्रकल्प आहेत. तीर्थक्षेत्र विकासाचे सारे प्रकल्प सुद्धा आमच्या काळात सुरू झालेले, त्यामुळे त्यातही काहीही नवीन नाही. या अर्थसंकल्पाने संपूर्णपणे निराशा केली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
प्रामाणिक शेतकऱ्यांना काहीही मिळालेलं नाही. मूळ कर्जमाफीच्या योजनेत 45 टक्के शेतकरी वंचित राहिले असून त्यांना एका नव्या पैशाची मदत झालेली नाही. शेतकऱ्यांना धान्यासाठी, विज बिलासाठी कुठल्याही प्रकारे सवलत दिलेली नाही. तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज ही फसवी बाब असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात 80 टक्के शेतकऱ्यांची कर्ज घेण्याची मर्यादाच 50 हजार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
कारखान्यात 500 लोकं चालतात, लग्नात 100 लोकंही नाही; कोरोनाशी अधिकाऱ्यांची सेटिंग?
ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पातील ‘या’ महत्वाच्या दहा घोषणा, जाणून घ्या
ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात पुण्यातील रिंग रोडबाबत मोठी घोषणा?, वाचा सविस्त
महिला दिनानिमित्त पहिल्यांदाच महिला खासदारांना संसदेत बोलण्याची संधी
ठाकरे सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळालं?, पाहा एका क्लिकवर!
Comments are closed.