बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसुख हिरेन यांची हत्या करुन मृतदेह खाडीत फेकला- देवेंद्र फडणवीस

मुंबई | मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्पोटक असलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा तपासादरम्यान मुंब्रा येथील रेती बंदराजवळ सापडला. हिरेन यांच्या मृत्यूवरून विधानसभेतही आगपाखड पाहायला मिळाली आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मनसुख हिरेन यांची गावडेंच्या परिसरात गाडीत हत्या केल्यानंतर खाडीमध्ये मृतदेह फेकण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे. हाय टाईडमध्ये बॉडी फेकली गेली असती तर ती परत कधीच आली नसती. पण त्यांच्या दुर्दैवाने आणि कायद्याच्या सुदैवाने लो टाईड होता आणि तो मृतदेह परत आला त्यामुळे हे उघडकीस आलं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणामध्ये मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी आपले पती आत्महत्या करणार नसल्याचं म्हणत या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यासोबतच त्यांनी सचिन वाझेंवर आरोप केले होते. माझ्या पतीचा खून झाला असावा अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा असा माझा संशय असल्याचं मनसुख हिरेन यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत बोलताना विमला हिरेन यांची तक्रार वाचुन दाखवली. त्यावेळी त्यांनी सचिन वाझेंना अद्याप अटक का करण्यात आली नाही, असा सवाल राज्य सरकारला देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ; पुन्हा आढळले 1 हजारांहून अधिक रूग्ण

…म्हणून सत्ताधाऱ्यांनी सभागृहात दिल्या ‘अमित शहा खुनी है’ अशा घोषणा!

संतापजनक! मुख्यध्यापकानेच केला दहावीतील विद्यार्थिनीवर बलात्कार

मुंबई पोलिसांचे ‘थोबाड काळे झाले’ अशी भाषा देवेंद्र फडणवीस कशी करू शकतात – अनिल देशमुख

खासदार नुसरत जहाँ यांच्या ‘त्या’ खास टॅटूची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More