Top News भंडारा महाराष्ट्र

“मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नाही, काही पक्षांची जाणीवपूर्वक ढोंगबाजी”

भंडारा | मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नसून काही पक्षांनी आदिवासींची दिशाभूल करुन केवळ ढोंगबाजी करत आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील पक्षांवर टीका केली आहे.

काँग्रेसने बाजारसमिती रद्द करण्याचे आश्वासन का दिले?, 2006 मध्ये कंत्राटी शेतीचा कायदा महाराष्ट्राने केला. महाराष्ट्राने केलेले कायदे चालतात? मग देशाचे कायदे का नाही? हा ढोंगीपणा का, असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

मुंबईतील आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने राज्यभरातील शेतकरी आंदोलनासाठी एकत्र आले आहेत. याप्रसंगी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रमुख उपस्थिती लावली आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर टीका केली.

दरम्यान, दिल्लीत गेल्या 60 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. ही लढाई सोपी नाही. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही, असं शरद पवरांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“पंजाबचा शेतकरी हा काय पाकिस्तानचा आहे का?, मोदींनी त्यांची साधी चौकशी केली का?”

“महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगणाला भेटायला वेळ पण शेतकऱ्यांना नाही

गायीची जशी पूजा केली जाते तशी शेतकऱ्याची पूजा करा- अबू आझमी

ज्यांचा हातात सत्ता आहे, त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही- शरद पवार

नवी मुंबईत गणेश नाईकांना आणखी एक मोठा धक्का!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या