बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना, त्यामुळे….”

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर देशभरातील वातावरण चांगलंच उफळलं आहे. आता यावरुन राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोपांची खेळी पहायला मिळत आहे. यातच एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर अनेक आरोप केले जात असून त्यांच्यावर आरोपांची झोडच सुरु आहे. यातच नबाब मलिक नवनवीन गौप्यस्फोट करत खळबळ माजवत आहे. आता यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आज पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोप केले. त्याचबरोबर त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिले समीर वानखेडेंना साथ देत असलेल्या भाजपच्या बडया नेत्यांची नाव समोर येतील असा इशाराही दिला. यावर ‘राष्ट्रवादीचा ‘पोपट’ रोज बोलतोय ना!’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हा भाजपचा पोपट असल्याचं म्हटलं आहे. यावर नाव न घेता फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना, त्याच्यामुळे कोण कोणाचा पोपट आहे?. तुमच्या करता हे महत्त्वाचे असेल आमच्याकरिता नाही’, असं फडणवीसांनी म्हटलं.

दरम्यान, या प्रकरणामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात याचा काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“पोपट पिंजऱ्यात गेला तर अनेक गुपितं उघड होतील अन्…”

फेसबुकने नाव बदललं अन् ट्विटरने उडवली खिल्ली, म्हणाले…

समीर वानखेडेंच्या ‘त्या’ दाढीवाल्या मित्राचा नवाब मलिकांनी केला खुलासा

‘5 किलो लाडूची सोय करा’ म्हणत लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचा भांडाफोड

समीर वानखेडेंना दिलासा मिळाला असला तरी अटकेची टांगती तलवार कायम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More