बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझे नेते अमित शहा, नरेंद्र मोदी’; पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले….

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांनी यांची वर्णी न लागल्याने पंकजा मुंडे समर्थक नाराज झाले होते. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा द्यायला सुरूवात केली होती. त्यानंतर समर्थकांनी पंकजा मुंडेंच्या मुंबईतील निवासस्थानी गर्दी केली होती. त्यावेळी पंकजा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांना धीर दिला आणि सर्वांचे राजीनामे नामंजूर केले होते.

त्यासोबतच पंकजा मुंडे यांनी बोलताना माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी राज्यातील नेत्यांची नावं घेणं टाळलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचंही नाव घेतलं नव्हतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं होतं. अशातच यावर देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी भाषण केलं होतं ते तुम्ही ते ऐकलं का? असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. यावर पंकजा मुंडेंचं भाषण ऐकण्याचा प्रश्नच नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंच्या भाषणावर खुलासा केला आहे. त्यांच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर खुलासेही केलेत. त्यावर आता मी बोलण्यात काही अर्थ नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, तुमचं पद मला प्रीतम ताईंच्या मंत्रिपदापेक्षा जास्त महत्वाचं आहे. आपलं घर आपण सोडायचं नाही. पंतप्रधान मोदींसाठी घोषणा द्या. त्यांना ऐकू जाईल एवढं मोठ्यांनी घोषणा द्या. माझ्या माणसांचे तुकडे पाडण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ते सफल होऊ देऊ नका, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी समर्थकांना केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?’; फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल

चिंता वाढली! देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पण मृतांच्या संख्येत घट 

“तुमचे आवडते मुख्यमंत्री पाचव्या नंबरवर आहेत हे विसरु नका”

‘इसमे गलत क्या है?’; पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला ‘या’ काँग्रेस नेत्याचा पाठिंबा

‘जबरदस्त काम करतायत मुख्यमंत्री’; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून योगींचं कौतुक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More