बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ही तर फक्त सुरूवात आता महत्वाचा भाग बाहेर येणं बाकी- देवेंद्र फडणवीस

मुंबई | मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या सापडलेली गाडी आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा सापडलेला मृतदेह हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

आता तर नुसती सुरूवात झाली आहे, एकच भाग बाहेर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पोलीस खात्यातील लोक सामील असतील तर कायदा आणि सुव्यवस्था कशी राहणार असा सवाल करत राज्य सरकारवर टीका केली आहे.

हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. माझ्याजवळ काही पुरावे आले त्यावेळी मी ते सभागृहात मांडले.  मात्र दुर्देवाने त्यावेळी सरकारच्यावतीने केवळ त्यांना पाठीशी घालण्याचं काम सातत्यानं होत होतं. कुठंतरी त्यांची वकिली करण्याचं काम हे सरकारच्यावतीने सातत्याने होत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मला असं वाटतं की आती जी एनआयएची कारवाई झाली आहे. त्यामध्ये अनेक पुरावे एनआयएला मिळालेले आहेत. कशाप्रकारे हा संपूर्ण गुन्हा घडला आहे?, हेसुद्धा समोर आलेलं असल्याचं फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्र ठरतोय गुन्ह्यांची राजधानी- चंद्रकांत पाटील

अंबानी स्फोटकं प्रकरणातील ‘ती’ कार मुंबई पोलिसांची; एनआयएच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर!

“सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा”

“दैव जाणिले कुणी?” या उक्तीप्रमाणे ते चौघे मरणाच्या दारातून परतले, पाहा व्हिडिओ!

आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल- शरद पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More