संजय राठोडांनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का?; फडणवीसांनी दिलं आश्चर्यचकीत करणारं उत्तर
मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्याने त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणाबाबत काही ऑडिओ क्लिप आणि फोटो व्हायरल झाले होते. यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीमाना दिल्यानंतर सरकारला हे उशिराने सूचलेलं शहानपण. संजय राठोड यांच्यावरील आरोप हे गंभीर आहेत. अशा परिस्थितीत मंत्रिपदावर राहणं चुकीचं होतं. कुठेतरी आपल्याला वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याने हा राजीनामा आला नाही. मुख्यमंत्री तो राजीनामा स्वीकारणार आहेत की नाही माहिती नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावेळी अधिवेशनात धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात घेणार का?, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला.
अशा प्रकारच्या जेवढ्या घटना असतील त्या सगळ्या प्रकरणात आम्ही आक्रमक भूमिका मांडणार पण एक लक्षात ठेवा भाजप आक्रमक आहे. आक्रस्ताळा नाही भाजप वस्तूस्थितीच्या आधारावर आंदोलन करत असल्याची सावध प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.
दरम्यान, राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पण विरोधकांनी या मुद्यावरून अधिवेशनात सरकारला घेरू नये यासाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याचं बोललं जात आहे.
थोडक्यात बातम्या-
“जे उद्धव ठाकरेंनी केलं ते शरद पवारांनीही करावं, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा”
राजीनामा देतो, फक्त… संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ एक विनवणी
राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, म्हणाले….
…मग आता संजय राठोड यांना अटक करा- अतुल भातखळकर
संजय राठोडांना आणखी एक मोठा धक्का, पूजाच्या कुटुंबातील ‘ही’ व्यक्ती तक्रार करण्यास आली पुढे!
Comments are closed.