Top News नागपूर महाराष्ट्र

‘2019 च्या सत्तास्थापनेची अजित पवारांशी नाही तर….’; फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

नागपूर | 2019 च्या वेळी सत्तानाट्य संपुर्ण महाराष्ट्राने पाहिलं. भाजप आणि राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केल्याने सर्वजण चक्रावले होते. त्यावेळी नेमकं काय झालेलं हे प्रत्येकाला जाणून घ्यायची इच्छा आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात गौप्यस्फोट केला आहे.

सरकार स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडूनच आला होता. आमची बोलणीदेखील अंतिम झाली होती. सरकार बनवण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली त्यानंतर खातेवाटप, जिल्ह्यांचे पालकमंत्रीदेखील निश्चित केलं होतं. याबाबत सर्व चर्चा शरद पवारांसोबत झाल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

निवडणुक झाल्यावर आमची शिवसेनेसोबत बोलणं चालू होतं. मात्र ते काँग्रेस आणि शिवसेनेसोबत जाणार असल्याचं समजलं. त्यानंतर आम्ही  10 ते 12 दिवस आम्ही विविध पर्यायांवर विचार केला आणि राष्ट्रवादीशी बोलणी केली असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

दरम्यान, फडणवीसांच्या कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह चालू होतं. या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांचे कॅमेरे नव्हते. मी  दिलखुलासपणे बोलू शकतो, असं फडणवीस म्हणाले. मात्र सत्तानाट्याबाबत शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यानंतर लाईव्ह बंद झालं आणि त्याची लिंकही काढण्यात आल्याचं समजतंय. याबाबत लोकमतने वृत्त दिलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“देशाच्या पंतप्रधानांना आव्हान देण्याची त्यांची ऐपत नाही”

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का घेतली नाही?- प्रकाश आंबेडकर

शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा

“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”

“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या