Top News महाराष्ट्र मुंबई

शिवसेना ही नाटक कंपनी आहे- देवेंद्र फडणवीस

मुंबई | औरंगाबादच्या नामांतरावरून सध्या राजकीय वातावरण चागलंच तापलं आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नाव करण्याची शिवसेनेची भूमिका आहे. मात्र सत्तेत असलेल्या काँग्रेसने आपला जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेना नाटक कंपनी आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस ठरवून करत आहे. शिवसेना औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करा असं म्हणत आहे. म्हणजे त्यांचे मतदार खुश होतील असं त्यांना वाटत आहे. काँग्रेस याला विरोध करत आहे म्हणजे त्यांचे मतदार खुश होतील, असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

शिवसेना आणि काँग्रेसच्या भूमिकेवरून असं लक्षात येतं की या ठिकाणी नुरा कुस्ती आहे. कारण दोन्ही पक्ष औरंगाबादच्या नामकरणाबाबत गंभीर नाहीत, असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, औरंगाबादमध्ये इतकी वर्षं सत्ता असूनही कुठलंही महत्त्वाचं काम न करता आल्यानं आता नामांतराची भाषा सुरू झाली असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘तीन काय 30 पक्षही एकत्र आले तरी ; भाजप खासदाराला विश्वास

‘महिलांना फक्त सन्मान आणि प्रेमाची गरज तुमच्या पगाराची नाही’; कंगणाचा शशी थरूर यांच्यावर निशाणा

धक्कादायक! शीर कापलेल्या नग्न अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह

‘शिवसेना नव्हे ही तर औरंगजेब सेना’; भाजपचा सेनेवर निशाणा

हिवरेबाजार, राळेगणसिद्धीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याची 30 वर्षांची परंपरा खंडित

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या