मंत्री 10 हजार लोकं जमवतो आणि अधिवेशनाला मात्र कोरोना, कोरोना- देवेंद्र फडणवीस
मुंबई | येत्या 1 मार्चला विधानसभेच्या अर्धसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे हे अधिवेशन होणार की नाही याबाबत राज्य सरकारकडून शंका व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकार अधिवेशन रद्द करण्यासाठी कोरोनाग्रस्तांचे वाढते आकडे सांगत असल्याचा आरोप केला होता. मात्र राज्यातील चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेनेची मंत्री यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. परंतू संजय राठोड स्पष्टीकरण देणार होते त्या दिवशी पोहरादेवी येथे त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या झालेल्या गर्दीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशनापासून म्हणजेच विरोधकांच्या आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. जे अधिवेशनात मांडायचे आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण अधिवेशन घेण्याची मागणी केली असल्याचं फडणीसांनी सांगितलं.
इथं कोरोना म्हणता आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरु आहे. तुमच्या मंत्र्यांना कुठलेच नियम नाहीत का?, नियम फक्त विरोधी पक्षासाठी आहेत का? असे सवालही फडणवीसांनी केले आहेत. तर अधिवेशन टाळण्यासाठी सरकारचं नाटक चालू असल्याची टीकाही देवेंद्र फडणवीसांनी केली.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेणं म्हणजे स्वत:च्या आमदारांना आणि मंत्र्यांना घाबरलं आहे. निवडणुकीत काही वेगळं चित्र निर्माण होईल का?, अशी भीती सरकारला आहे. त्यामुळे विधानसभा अधिवेशनाचा विषय अजेंड्यावर आणला जात नसल्याचं फडणवीस म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“आम्ही वाघ आहोत अशा डरकाळ्या फोडण्यापेक्षा चित्राताईंसारखी “वाघा”ला साजेशी भूमिका घ्या!”
“दोन मिनिटाच्या भेटीत बहुदा कानात सांगितलं असावं, मी तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाही”
‘पबजी लव्ह स्टोरी’; पबजी खेळत असताना जडलं प्रेम, विवाहित महिला झाली बेपत्ता त्यानंतर….
आत्महत्या करण्यासाठी तीने आईस्क्रीममध्ये विष मिसळलं, मात्र त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार
पत्नी म्हणजे मालमत्ता नाही- मुंबई हायकोर्ट
Comments are closed.