बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सतत केंद्राकडं बोट दाखवण्याची सवय सोडा, राज्य सरकारने असं वागणं बर नाही”

अहमदनगर | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला थोपवून लावण्यासाठी केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र लसीकरणाची या मोहिम लसीच्या अपुऱ्या डोसामुळे मंद गतीने चालू आहे. यावरून सत्ताधारी राज्य सरकार केंद्रावर टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची राज्य सरकारला सवय लागली आहे. आताही सवय सोडा. कधी तरी आत्मचिंतन करा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.कोपरगाव येथे 40 ऑक्सिजन बेडच्या कोविड सेंटरचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची राज्य सरकारला सवय लागली आहे. त्यांनी कधी तरी आत्मचिंतन केलं पाहिजे. कधी काय करावं याचा विचार सरकारने केला पाहजे, असं सांगतानाच आपत्ती कोणत्याही एका पक्षाची नसते. आपत्तीत सर्वांनी मिळून काम करायचं असतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान,चांगलं झालं आपली पाठ थोपटून घेतात. पण त्यात काही उणीव दिसली की लगेच केंद्राकडे बोट दाखवतात. राज्य सरकारचं असं वागणं बरं नाही, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

थोडक्यात बातम्या- 

शाब्बास पुणेकरांनो! आज बाधितांचा आकडा हजाराच्या आत तर…; वाचा आजची आकडेवारी

…अन् वरातीतील पाहुण्यानंच नवरीसोबत घेतले सात फेरे!

‘किसान सन्मान निधीचे पैसे तुघलकी पद्धतीने वसूल करायचं ठरवलं की काय?’; पवारांचा मोदी सरकारला सवाल 

माणुसकी हरवली! रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ, पत्नीने दिला पतीला अग्नी 

“भारतात कोरोनाच्या आणखी बऱ्याच लाटा येणार, पुढील 6 ते 18 अत्यंत महत्त्वाचे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More