बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठाकरे सरकार कायद्याने चालत नाही हे राष्ट्रपतींना कळवा”

मुंबई |  राज्यात आरक्षण, कोरोना आणि बाकी मुद्द्यांवरून पुर्ण अधिवेशन घेण्याची मागणी विरोधी पक्षाने केली होती. मात्र राज्य सरकारने 5 जुलै आणि 6 जुलै या दोन दिवशी पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत तीन मागण्या केल्या आहेत.

राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे त्यामुळे अधिवेशनाचा काळ दोन दिवसाऐवजी पूर्ण अधिवेशन घ्यावं, विधानसभा अध्यक्षांची रखडलेली निवडणूक घ्यावी आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देऊ नका, या तीन मागण्या देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांकडे केल्या आहेत. राज्यापलांची भेट घेतल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाराष्ट्र सरकार हे कायद्यानं चालत नाही, इथे संविधानिक नियमांची पायमल्ली होत आहे, हे राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून द्या, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी भगतसिंह यांच्याकडे केली आहे.  त्यासोबतच ओबीसी आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळ गेलं, गेल्या 40-50 वर्षात पहिल्यांदा ओबीसींना राजकीय आरक्षण या सरकारने ठेवलं नाही. आरक्षणाचा मार्ग निघेपर्यंत निवडणुका घेऊ नका असं सरकारने सांगितलं होतं पण त्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्यापालांना विनंती केली आहे की या निवडणुका पुढे ढकला. राज्य सरकारने ओबीसींबाबत विश्वासघात केला असल्याचं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, निवडणुका जर घेणार असाल तरीही भाजप या जागांवर केवळ ओबीसी उमेदवार देईल. निवडणूक जिंकलो हरलो काहीही होवो, ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप पाठपुरावा करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला; किवींना विजयासाठी 139 धावांचं लक्ष्य

‘आता एवढा माज आला का?’; शहनाझचा ‘हा’ व्हिडीओ पाहून भडकले चाहते

‘…तर आमचा उमेदवार हरला तरी आम्हाला पर्वा नाही’; जि.प. पोटनिवडणुकीबाबत फडणवीसांंचं मोठं वक्तव्य

सलाम कोल्हापूरांना! कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या खऱ्या हिरोंच्या कौतुकासाठी केला हा खास उपक्रम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More