बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे”

मुंबई | राज्यातील अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्ष भाजपने आवाज उठवला आहे. त्यासाठी पुर्ण वेळ अधिवेशन घेण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. मात्र राज्य सरकारने दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकारणी बैठकीत सरकारला धारेवर धरत खोचक अशी टीका केली आहे.

पोलीस विभागातील वाझे तर सापडला मात्र अन्य विभागातील वाझेचा पत्ता आम्हाला लागला म्हणून पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं करण्याचा निर्णय या सरकारने घेतला असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर टीका केली आहे. त्यासोबतच मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील ठाकरे सरकार हे भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचाराने बरबटलेलं आहे. कोणत्याही सरकारमध्ये 1 मुख्यमंत्री असतो मात्र या सरकारमध्ये प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजत आहे. एखादा निर्णय घेतला जातो मात्र काही तासाभरात तो रद्द होतो आणि दुसऱ्यादिवशी नवीन निर्णय घेतला जातो. सरकार आहे की सर्कस, अशा शब्दात फडणवीसांनी सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना कोरोनाच्या मॉडेलवरूनही फडणवीसांनी निशाणा साधला.

दरम्यान, महाराष्ट्रात देशातले 33 टक्के मृत्यू झाले आहेत. ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून अनेकांना आपला प्राण गमवाव लागला. जे या सरकारची पाठ थोपटतात त्यांना विचारावं वाटतं की तुुमचं डोक ठिकाणावर आहे का, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुलासमोर गांजा ओढायचे इरफान खान?; व्हायरल फोटोवर बाबीलनं दिलं उत्तर, म्हणाला….

“चेहरा भोळा आणि भानगडी सोळा, असं राज्यातील सरकार आहे”

आंबिल ओढा परिसरातील नागरिकांना दिलासा; न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

‘उपमुख्यमंत्री अजित पवारांची सीबीआय चौकशी करा’; भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव

बारावीच्या परीक्षा घेऊन तुम्हाला काय वेगळं सिद्ध करायचंय?; सर्वोच्च न्यायालयाने खडसावलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More