बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ठाकरे सरकार’ हे महाराष्ट्राच्या इतिहासातील ‘लबाड सरकार- देवेंद्र फडणवीस

मुंबई | महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे सरकार हे लबाड सरकार म्हणून ओळखलं जाणार आहे. राज्यात वीज कनेक्शन तोडण्यावर स्थगितीची घोषणा सरकारनं सभागृहात केली होती. मात्र आता सरकार त्यासाठी असमर्थ असल्याचं सांगत आहे. राज्याच्या जनतेच्या डोळ्यात सरळसरळ धूळफेक करण्याचं काम ठाकरे सरकारनं केल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारची केवळ नौटंकी सुरू आहे. घोषणा करायच्या आणि नंतर त्यावर मागे फिरायचं यातून राज्यातील सामान्य जनता आणि शेतकरी भरडून निघत आहेत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीसांनी अनेक मुद्यांवरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

राज्याचा विरोधी पक्ष खंबीरपणे आपलं काम करत असून सभागृहात अतिशय महत्वाच्या क्षणी मुख्यमंत्र्यांनी येऊन संबोधित करण्याची गरज होती. पण ते आले नाहीत. या अधिवेशनातून महाविकास आघाडी सरकारनं अक्षरश: पळ काढला, असं म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनाही टोला हाणला. त्यासोबतच राज्याच चर्चेत असलेल्या मनसुख हिरेन प्रकरणातील पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावरूनही सरकारवर फडणवीसांनी टीका केली.

दरम्यान,  सचिन वाझे यांच्याविरोधात इतके गंभीर पुरावे असतानाही त्यांना पदावरुन दूर केलं जात नाही आणि खुद्द राज्याचे मुख्यमंत्री त्यांची बाजू घेत आहेत हे अतिशय आश्चर्यकारक असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

सचिन वाझेंचं आणि शिवसेनेचं काय आहे जुन नातं?, मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

‘सचिन वाझे जणू ओसामा बीन लादेन…’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

जागतिक अंतिम कसोटी सामना ‘लाॅर्डस’ नव्हे तर ‘या’ ठिकाणी होणार

“जो पर्यंत मुख्यमंत्री गप्प तो पर्यंत विधानसभा ठप्प”

बंगळूरच्या ‘या’ आज्जी ठरल्या कोरोनाची लस घेतलेल्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More