बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दोन कोटी लसी जमिनीतून उगवल्या का?- देवेंद्र फडणवीस

मुंबई | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण करण्याला परवानगी दिली. मात्र लसीच्या अपुऱ्या डोसमुळे लसीकरण मोहीम मंद गतीने चालू आहे. लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये टीका होत आहे. अशातच राज्य सरकारने काल दोन कोटी लसींचा टप्पा पूर्ण केलं असल्याचं जाहीर केलं. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

महाराष्ट्रापेक्षा दुप्पट लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशला दीड कोटी लसी आत्तापर्यंत मिळाल्या आहेत. तर महाराष्ट्राला दोन कोटी लसी मिळाल्या. या लसी कुठून आल्या? जमिनीतून उगवल्या का? केंद्रानेच दिल्या ना तरीही सरकार कांगावा करत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती हातळण्यात अपयशी ठरलं आहे. काही नेत्यांची स्क्रिप्ट ठरलेली असते. केंद्राने दिलं नाही, केंद्राने करायला पाहिजे. याच गोष्टी हे नेते रोज सकाळी उठून जे घडेल त्याबद्दल बोलत असतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस महाडमध्ये एबीपी माझाशी बोलत होते.

दरम्यान, महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आला असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. यावरुन दिल्लीच्या कोर्टात सुनावणीही सुरु आहे, महाराष्ट्राला सर्वात जास्त ऑक्सिजन का?, तरीही सरकार केंद्राच्या नावाने कांगावा करत आहे. सरकारला वाटत आहे की त्यामुळे गोंधळ निर्माण होईल. मात्र हा गोंधळ तात्पुरत्या स्वरूपाचा असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुल होत नाही म्हणून पतीने उचललं अत्यंत धक्कादायक पाऊल!

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या तिपटीने अधिक

अंधश्रद्धेचा कहर ! कोरोना रोखण्यासाठी 7 लाखांची पुजा, खंडीभर बोकडांचे बळी अन्…

गेले 27 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत असलेल्या ‘या’ मालिकेच्या नव्या पर्वाचं ट्रेलर प्रदर्शित

आमच्या मागे ईडी आली तर खिशात चणे, फुटाणे आणि शेंगदाणे मिळतील- गिरीश बापट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More