Top News नागपूर महाराष्ट्र

“उद्धव ठाकरेंना 50 वर्ष मुख्यमंत्री राहण्यासाठी शुभेच्छा”

नागपूर | मला 2050 मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला बोलावलंत तरी मी येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत उद्योजकांशी संवाद साधताना म्हणाले होते. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकआशावादी आहेत, याचा मला आनंद आहे. त्यांना 50 वर्षे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी राहण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

परदेशी गुंतवणुकीत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. आधी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होत होती. महाराष्ट्र या गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होता. आता तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

दरम्यान, जैतापूरमध्ये मोबदला मिळाल्याने प्रकल्प होऊ शकतो, असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. त्यांच्या भूमिकेत झालेला हा बदल पाहून आनंद वाटतो. मात्र हा मोबदला कोणाला मिळाला, हे पाहावं लागेल, असा टोला फडणवीसांनी लगावला.

थोडक्यात बातम्या-

‘आपल्याला शिवसेनेबरोबर कायम रहायचंय त्यामुळे…’; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सूचना

‘मी भाजपमध्ये प्रवेश केला असता तर…’; मंत्रिमंडळातील ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्यात देखील नाईट कर्फ्यूची घोषणा!

“ज्यांच्या राजकारणाचं दुकान घराणेशाहीच्या खांबावर उभं आहे त्यांनी संघराज्य, लोकशाहीवर न बोललेलं बर”

शेतकरी दिनी बळीराजाला आंदोलन करावं लागतंय हे दुर्दैव- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या