Top News पुणे महाराष्ट्र

‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

पुणे | राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शेतकरी संवाद यात्रेदरम्यान ते पुण्यात बोलत होते.

राज्यात शेतकरी संकटात असताना राज्य सरकारने कोणतीही मदत केली नाही. शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. परंतू प्रत्यक्षात सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाजपचं सरकार असताना चार वर्ष प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात आली. राज्य सरकार मात्र पीक विमा कंपनीदेखील अपॉईंट करू शकलं नाही. त्यामुळे सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना  मूर्ख बनवण्याचं काम करत आहे, असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, आम्ही केलेल्या कर्जमाफीचा लाभ 42 लाख शेतकऱ्यांना झाला होता. मात्र यांची कर्जमाफी 29 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

नरेंद्र मोदी हेच शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक आहेत- अमित शहा

“रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही”

जळगावात भाजपला धक्का; ‘या’ नेत्याने दिली भाजपला सोडचिठ्ठी

आधी काश्मीर ताब्यात घेऊ, मग भारतावर हल्ला करू- शोएब अख्तर

आमदारकी नाही मिळाली तरी काम करत राहणार- ऊर्मिला मातोंडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या