बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कायदा बनला होता तेव्हा श्रेय घेणारे आज म्हणतात कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता- देवेंद्र फडणवीस

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा रद्द केल्यामुळे राज्यात यावरून राजकारण चालू आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांना निवदेन सादर केलं. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते यांना टोला हाणला होता. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता! किती हा दुटप्पीपणा?, असा खोचक सवाल करत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

मग प्रश्न उपस्थित होतो की, भाजपा सरकारच्या काळात हाच कायदा हायकोर्टात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा स्थगिती देण्यास नकार देते. नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते आणि कायदाही अवैध ठरतो. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण?, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जर कायदा फुलप्रूफ होता तर आता आम्हाला राज्यपालांना भेटायची वेळ आली नसती, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आम्ही सर्वांनी समाजाच्या भावना लक्षात घेता केंद्राला याबाबत विनंती करायचं ठरवल. त्यानुसार आज राज्यपालांना भेटून पहिले पाऊल टाकलं आहे. मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवला आहे. आरक्षण प्रश्नी सरकार सोबत आहे याची समाजाला कल्पना आहे, ते सरकारच्या विरोधात नाहीत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या- 

पुण्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ, वाचा आजची आकडेवारी

धोका वाढला! महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस आजाराचा दुसरा बळी, तर इतक्या रूग्णांवर उपचार चालू

संतापजनक! भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने महिलेला शेतात नेत केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

“कोरोनावर आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी मला जामीन देण्यात यावा”

‘देवेंद्र फडणवीसांनी बनवलेला तो कायदा जर फुलप्रूफ असता तर…’; उद्धव ठाकरेंचा पलटवार

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More