बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम आरक्षणाला विरोेध हे हिमताने सांगावं; फडवीसांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

मुंबई | धर्माच्या आधारे मुस्लिमांना आरक्षण देता येणार नाही. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध असून त्यांना आम्ही आरक्षण देऊ शकत नाही, हे मुख्यमंत्र्यांनी हिमताने सांगावं, असं आव्हान विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं आहे.

विधानपरिषदेत शासनाच्यावतीने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देणार अशी घोषणा केली. यावर मुख्यमंत्र्यांचं मत वेगळं असेल तर त्यांनी स्पष्ट करावं. आमच्यापर्यंत मुस्लिम आरक्षणाचा विषय आलेला नाही, असं गालेगोल उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं, अशी टीका फडणवीस यांनी केली. पत्रकार परिेषदेत ते बोलत होते.

आरक्षणाचा विषय हा तुमच्याच मंत्र्यांनी मांडला आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नसल्याचं ठाकरेंनी स्पष्टपणे सांगावं, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारकडून शेतकऱ्यांचा वचनभंग झाला असल्याचं म्हणत फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला.

ट्रेंडिंग बातम्या-

चोरट्यांनी चक्क भाजप नगरसेविकेलाच लुटलं!

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरचे विदुषकी खेळ थांबवावेत- राहूल गांधी

मुख्यमंत्रिपद जाताच देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं पुस्तक; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रकाशन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More