मुंबई | कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी ठाकरे सरकार करत असलेले प्रयत्न घेत असलेले निर्णय अपुरे आहेत. मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखती ते बोलत होते.
पूर्णपणे सुरक्षित आहोत असं अजूनही म्हणता येणार नाही. पण पंतप्रधान मोदींनी वेळीच लॉकडाऊन केल्यामुळे आपण कम्युनिटी स्प्रेड थांबवू शकलो. महाराष्ट्र कम्युनिटी स्प्रेडच्या दारावर असून दार ठोठावतोय. अजूनही स्प्रेड झाला नाहीये, पण आत्ता सोशल डिस्टन्सिंग पूर्ण ताकदीने पाळलं पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मी मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगितलं की भाजप त्यांच्या पाठीशी आहे आणि कठोर निर्णय घेतले तरी आम्ही पाठिंबा देऊ. आज मूल्यमापन करण्याची वेळ नाही. पण सरकारने घेतलेले निर्णय पुरेसे नाही. सरकारने धाडसी पावलं उचलण्याची गरज असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सरकारमध्ये समन्वय नाही. मुख्यमंत्री काय सांगतात हे मंत्र्यांना माहीत नसतं. उपमुख्यमंत्री काय सांगतात ते मंत्र्यांना माहिती नसतं. त्यांच्याच खरं तर चर्चा व्हायला हवी. कोव्हिडची साथ आली असताना आणि कर्मचाऱ्यांचे पगार पुढे ढकलले जात असताना सिंचन, बांधकाम वगैरे विभागांना पैसे का दिले जात आहेत?, असा सवालही फडणवीसांनी केला.
ट्रेंडिंग बातम्या-
- कोरोनाचा असाही परिणाम; गंगामाई घेऊ लागली आहे मोकळा श्वास!
- कोरोना बरा होण्यासाठी दररोज गाढविनीचं दूध प्या; या नेत्यानं तोडले अकलेचे तारे
महत्वाच्या बातम्या-
“मोदी द्वेषापोटी केंद्र सरकारने दिलेले मोफत धान्य ठाकरे सरकार वाटत नाही”
पार्थ पवार फाऊंडेशनचा गरजू लोकांना मदतीचा हात; हजारो जणांना मोफत जेवण
धक्कादायक, कोरोनाने पुण्यात आणखी दोघांचा बळी
Comments are closed.