बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वारिस पठाणांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर फडणवीस म्हणतात…

नागपूर | एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून देशभरात पडसाद उमटत आहेत. देशभरातून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात असताना आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे.

वारिस पठाण यांचं वक्तव्य निंदनीय आहे. खरंतर या देशात 100 कोटीहून अधिक हिंदू असल्यानेच देशात कुणालाही बोलण्याचा अधिकार आहे हे वारिस पठाण यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्यांनी  केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली पाहिजे असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एखाद्या मुस्लिम राष्ट्रामध्ये कुणी बोललं असतं तर तेथे काय अवस्था झाली असती? हे पठाण यांनी लक्षात घ्यायला हवं, असा सणसणीत टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

दरम्यान, सीएए, एनआरसीवरून देशभरातील वातावरण तापलं असून पठाण यांच्या वक्तव्याने त्यात आणखी भर पडली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

तमाशाने कोणी बिघडत नाही आणि कीर्तनाने कोणी सुधरत नाही- रघुवीर खेडकर

सीएएला घाबरण्यासारखे काहीही कारण नाही; मोदींच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

महत्वाच्या बातम्या-

15 कोटीच काय अख्खा पाकिस्तान आणा… आम्ही थुंकलो तरी तुम्ही उडून जाल- मनसे

…म्हणून मी मोठ्या मनाने तुमची माफी मागते- तृप्ती देसाई

मिसळसोबत ब्रेड नको पाव द्या; पुणेकर तरुणाचं आंदोलन व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More