बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बंगालमध्ये पराभव झाला म्हणजे मोदी आणि शहांची लोकप्रियता कमी झाली नाही”

मुंबई | पश्चिम बंगालमध्ये तृृणमूल काँग्रसने पुन्हा एकदा आपली सत्ता राखली आहे. जवळपास 200 जागांच्या आकडा तृृणमूल काँग्रसेने पार केला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना पश्चिम बंगालमध्ये आता भगव्याचा बोलबाला सुरु झाल्याचं म्हटलं आहे. यावेळी ममता बॅनर्जी आणि शुवेंधू अधिकारी यांच्यातील झालेल्या अटीतटीच्या लढतीवरही त्यांनी भाष्य केलं आहे.

बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनासुद्धा निवडून येण्यासाठी दमछाक करावी लागली. त्यामुळे फक्त बंगालमध्ये पराभव झाला म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांची लोकप्रियता कमी झाली असं म्हणता येणार नाही. बंगालमधील पराभवाचं केंद्रीय नेते विश्लेषण करतील. आम्ही आसाम आणि पदुच्चेरीमध्ये जिंकलो आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. दुसऱ्याच्या घरी मुलगा झाल्यानंतर ते मिठाई वाटत आहेत. ढोल पिटत आहेत. येथे काँग्रेसची काय अवस्था झाली, हे पाहण्यासारखं आहे. ममता जिंकल्या म्हणजे काँग्रेस जिंकला असा अविर्भाव निर्माण झाला आहे. मागच्या वेळी आमचा फक्त 3 जागांवर विजय झाला आहे. यावेळी 80 पेक्षा जास्त जागांवर आम्ही निवडून आलो आहोत, असंही फडणवीस म्हणाले. त्यासोबतच त्यांनी पंढरपूरच्या पोटनिवडणुकीवरही भाष्य केलं आहे.

दरम्यान, आम्ही जनतेपर्यंत पोचून त्यांची मतं मिळवू शकलो. येथील बारा बलुतेदारांमध्ये नाराजी होती. तसेच शेतकऱ्यांची वीज तोडली गेली, त्याबद्दलसुद्दा सरकारविरोधात नाराजी होती. त्याचाच हा परिणाम आहे. हा विजय विठ्ठलामुळे मिळाला, हा विजय विठ्ठलाला समर्पित करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“रडीचा डाव सुरु आहे”; ‘त्या’ निकालाबाबत शरद पवार यांची मोठी प्रतिक्रिया

“अजित पवारांना गर्व झाला होता, त्यांची टगेगिरीची भाषा होती, तो गर्व मोडून काढला”

नंदिग्राममध्ये ममतांचा खरंच पराभव झाला का?, तृणमूलचं महत्त्वाचं ट्विट

आता पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- नवाब मलिक

‘मी करेक्ट कार्यक्रम करतो, पण…’; पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More