मुख्यमंत्र्यांना चौकातलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यातलं अंतर लक्षात आलेलं नाही- देवेंद्र फडणवीस
मुंबई | राज्यात 1 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू झालं आहे. अधिवेशन चालू झाल्यापासून विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना अनेक विषयांवरून धारेवर धरलं. त्यानंतर विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना टीका केली आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला जी चर्चा झाली त्या चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री तासभर बोलत होते. पण या तासाभरात ते महाराष्ट्रात आले नाहीत. यामध्ये ते चीनमध्ये गेले, पाकिस्तानात गेले, अमेरिका, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, काश्मीरसह दक्षिणेतही गेले. महाराष्ट्राबद्दल एकही वाक्य बोलू शकले नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांना आता भरपूर दिवस झाले आहेत. पूर्वी ते नवीन होते. आता ते नवीन नाहीत, पण चौकातलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यातलं अंतर हे मुख्यमंत्र्यांना अद्यापही लक्षात आलेलं नाही.सभागृहात उपस्थित झालेल्या मुद्यांवर बोलावं लागतं, राज्याच्या प्रश्नांवर बोलावं लागतं. दुर्देवाने शेतकऱ्यांच्या संदर्भात एक मुद्दा देखील ते मांडू शकले नसल्याचं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. तर शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही त्याबद्दल बोलले नाहीत, बोंड आळीबद्दल ते बोलले नाहीत. विम्याबद्दल ते बोलले नाहीत. वीज तोडणीबद्दल ते बोलले नाहीत, असंही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात साडेतीन लाख शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना चिंता कुणाची आहे? तर दिल्लीत सिंघू बॉर्डरवर बसलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडली जाती आहे, याची चिंता त्यांना असल्याचं म्हणत फडणवीसांनी राज्यातील वीज कनेक्शन तोडणवरून टीकास्त्र सोडलं.
थोडक्यात बातम्या-
माझी थट्टा करा पण… मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं ‘हे’ कळकळीचं आवाहन
धक्कादायक! बलात्काराच्या आरोपात 20 वर्षांची शिक्षा भोगली, आता सुटला निर्दोष…
पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ‘या’ बड्या गुंडाला घरात घुसून ठोकल्या बेड्या!
एका षटकात ‘या’ खेळाडूने ठोकल्या 28 धावा, चक्क! स्टेडियममधील खुर्चीचं तोडली – पाहा व्हिडीओ
बिकनी शूटसाठी अभिनेत्री 2 दिवस उपाशी ‘हे’ आहे कारण
Comments are closed.