बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांनाही कळू द्या त्यांचे मंत्री काय कांड करतात ते”

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आज पत्रकार परिषद घेत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर बॉम्ब फोडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर काही घोषणा करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी आज पत्रकार परिषद घेत नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांवर खळबळजनक आरोप केले आहेत.

नवाब मलिकांच्या कुटुंबियांनी अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी केली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. नवाब मलिक यांची 5 प्रकरणं आहेत. मी सांगितल्याप्रमाणे नवाब मलिकांच्या या प्रकरणाचे पुरावे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे देणार आहे. शरद पवारांना देखील त्यांचे मंत्री काय कांड करतात ते कळू द्या, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

सॉलिडस नावाची मलिकांची कंपनी असुन कुर्ला येथील एलबीएस रोडवरील 1 ताख 23 हजार सक्वेअर फुट जमीनीची एक रजिस्ट्री सॉलिडस कंपनीसोबत झाली आहे. तर या जमिनीची विक्री सलिम पटेल आणि शाहवली खान यांनी केली असुन ही दाऊदची माणसं असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच मी जे सांगणार आहे ते सलीम जावेद यांची कथा किंवा इंटरवल नंतरचा चित्रपट नसून देशाच्या सुरक्षेबद्दलचा प्रश्न असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हटले होते. तर पत्रकार परिषदेत नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर घणाघाती आरोप केल्यावर या प्रकरणांचे सगळे पुरावे शरद पवारांकडे देणार म्हणत फडणवीसांनी मलिकांवर हल्लाबोल केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट

‘मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते’; नवाब मलिक यांचं सूचक ट्विट

देवेंद्र फडणवीसांनी फोडला बॉम्ब; नवाब मलिकांवर केलेल्या आरोपांनी खळबळ

“लोकांनी निवडून दिलं तर यांनी देशच विकायला काढला”

पेट्रोल- डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या किंमत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More