बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांची ‘ती’ पत्रं घेऊन विरोधी पक्ष आज राज्यपालांची भेट घेणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई | राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. फक्त गाजावाजा करत कर्जमाफीची घोषणा केली. एकही नवा पैसा शेतकऱ्याला दिला नाही. 2 महिन्यात फक्त 15 हजार शेतकऱ्यांची नावांची यादी जाहीर झाली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

कोल्हापूरातील 50 हजार शेतकऱ्यांनी फसव्या कर्जमाफीविरोधात पत्र लिहली आहेत. ती पत्रे राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांच्याकडे सोपवणार आहे. शेतकऱ्यांची कशी फसवणूक सुरु आहे हे राज्यपालांना सांगणार आहे, असं म्हणत फडणवीसांनी आज राज्यपालांना भेटणार असल्याचं सांगितलं आहे.

महिन्याला फक्त साडे सात हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा विक्रम या सरकारने केला आहे. अशी कर्जमाफीची घोषणा केली तर 35 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारला 400 महिने लागतील, असा टोलाही यावेळी फडणवीसांनी लगावला आहे.

ज्या गावात शेतकरी कर्जमाफीच्या याद्या जाहीर झाल्या, त्या गावातील 35 टक्केही शेतकरी कर्जमाफीत येत नाहीत. सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक होत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ट्रेंडिंग बातम्या-

“भाजपला पाहून जुने दिवस आठवले, आमचेही घसे असेच कोरडे पडायचे”

‘मलंग’ चित्रपटामुळे वाढली दिशा-आदित्यची लोकप्रियता

महत्वाच्या बातम्या-

“देवेंद्र फडणवीस आपला ‘गजणी’ झालेला दिसतोय”

…तर शेतकरी कर्जमाफीला 400 महिने लागतील- देवेंद्र फडणवीस

देशाला अस्वस्थ करणारी ही दृश्यं तुम्ही पाहिली का?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More