बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फडणवीसांना तो धोका आणखी दिसतोय, उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र

मुंबई |  गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सांगली कोल्हापूरला प्रचंड मोठा महापुराचा तडाखा बसला. अश्या प्रकारचा तडाखा पुन्हा बसू शकतो, अशी भिती व्यक्त करणारं तसंच त्यावर उपाययोजना सांगणारं पत्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.

कोल्हापूर सांगलीत पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून अलमट्टी धरणातून विसर्गाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांसोबत तातडीने बैठक घेऊन विसर्ग कसा असावा, याबाबत संयुक्त करार करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.

एका क्षमतेपेक्षा अलमट्टीचा विसर्ग जास्त वाढविला की कर्नाटकमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आपल्या आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवण्यास ते राजी नसतात त्यासाठी त्यांच्याकडे सारखा पाठपुरावा करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर मी यापूर्वीही आपल्याला पत्र लिहिलं आहे. त्यावर आपण कारवाई करीत असालच, अशी मला आशा आहे, असं फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे.

आपल्या धरणाच्या विसर्गात छोट्या-मोठ्या नद्यांचे पाणी येऊन मिळते आणि पुढे अलमट्टी धरणामुळे हे पाणी अडल्याने महाराष्ट्राची पाण्याची पातळी वाढून मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होते. अशावेळी अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढविणे, हाच पर्याय ठरतो. असा अनुभव त्यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगितला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“मोदीजी…माझ्या पतीचं बलिदान व्यर्थ जायला नको, चीनी सैनिकांना ठार मारा”

चीननं कसा केला भारताचा विश्वासघात?, भारतीय जवानांनी सांगितली इनसाईड स्टोरी

महत्वाच्या बातम्या-

प्रकाश आंबेडकरांनी अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची घेतली भेट, दिला ‘हा’ शब्द

समस्या नव्हे, ही तर संधी…! पाहा तुकाराम मुंढेंनी 45 दिवसांत नागपुरात काय केलंय…

कोरोनामुळे ट्रम्प मोठी घोषणा करण्याची शक्यता; भारतीयांसाठी असेल सर्वात मोठा धक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More