सांगली | गेल्या 2 दिवसात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली आहे. याच पार्श्वभमीवर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कुणालाही ईडीची नोटीस मिळाली की भाजपवर आरोप केले जातात, भाजपला समोर केलं जातं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजपच्या आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप कार्यक्रमानंतर इस्लामपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
एकनाथ खडसे यांच्यानंतर लगेच संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस यावर आपलं मत काय आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. याबाबत तुम्ही ईडीला विचारलं पाहिजे’.
दरम्यान, आ देखे जरा किसमे, कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया, गाण्याच्या ओळी शेअर करत राऊतांनी बोलकी प्रतिक्रिया दिली.
थोडक्यात बातम्या-
“मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली”
प्रसिद्ध सराफी व्यावसायिक मिलिंद मराठे यांचं निधन; आत्महत्येचा केला होता प्रयत्न
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली उतरणार राजकारणात?
पत्नीला मिळालेल्या ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
कोरोना हा महासाथीचा शेवटचा आजार नाही- WHO