बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सेल्फी प्रकरणी गिरीश महाजनांची मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण!

सांगली | गिरीश महाजन यांनी सेल्फी काढला नाही. जिथं कोणी पोहोचलं नाही तिथं ते पोहोचले.. मंत्री पोहोचल्याने लोकांना दिलासा मिळाला, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पाठीशी घातलं आहे.

गिरीश महाजन यांचा सेल्फी काढतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना पाठीशी घालत महाजन यांनी सेल्फी काढण्यासाठी नाही तर सोडायला आलेल्यांना हात केला होता, असं मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील पूरस्थितीचे राजकारण करु नका. उलट मदतीसाठी पुढे या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं आहे.

दरम्यान, दोन तीन दिवसांपासून मदतीसाठी राज्य सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. आणि इथून पुढच्या काळात देखील राज्य सरकार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर राहील, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या-

-प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेवर जोरदार टीका

“ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही, त्यासाठी पुष्कळ जागा आहेत”

-“चंद्रकांत पाटलांना 250 जागांचा अंदाज येतो, पावसाचा येत नाही का???”

-ब्रह्मनाळ दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची माहिती

-सरकारने निर्लज्जपणाचा कळस केलाय- अशोक चव्हाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More