मुंबई | राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस होता. यावेळी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख सन्मानानेच झाला पाहिजे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी कंगणा आणि अर्णब गोस्वामी यांचे कान टोचले आहे.
कंगणा राणावत आणि अर्णब गोस्वामी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी रेकॉर्डवर सांगतोय की आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योग्यच केला पाहिजे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तसेच देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेखही योग्यच झाला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
तुमच्या वर्षभराच्या कार्यकाळाच्या कामकाजाचा अहवाल सांगणाऱ्या पुस्तकात आमच्याच काळातील कामं का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
तुम्ही काहीतरी कल्पकता वापरा, आमचं कशाला कॉपी करताय, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
थोडक्यात बातम्या-
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुणे पोलिसांकडून अटक; पाहा काय आहे प्रकरण…
आणखी स्वस्त झाली कोरोना चाचणी; जाणून घ्या काय आहेत नवीन दर!
भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय पंतप्रधान मोदींना जात- मुकेश अंबानी
कोरोनाची लागण झालेले मंत्री अनिल विज यांची प्रकृती बिघडली
भाजप हीच खरी तुकडे तुकडे गँग- सुखबीर सिंग बादल