बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यपालांच्या प्रामाणिक कामामुळे काहींना मळमळ- देवेंद्र फडणवीस

मुंबई | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये खटके उडताना दिसतात. तीन-चार दिवसांपुर्वी राज्यपालांनी तीन जिल्ह्यांचा दौरा केला होता. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली होती. यावरून आता राजकारण रंगाताना दिसत आहे. अशात विरोधी पक्षनेतेे देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल प्रामाणिकपणे आपलं काम करत आहे. त्यामुळे काहींना मळमळ होत आहे. ती मळमळ बाहेर पडताना दिसत आहे. त्यामुळे त्या लोकांना सल्ला आहे की त्यांनी भारतीय संविधानाचं वाचन करावं आणि त्यानंतर तशाप्रकारची वक्तव्य करावीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यपाल राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना संविधानाने मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला सल्ला देण्यासाठी तयार केलं आहे. त्यामुळेच राज्यपालांना दौरा करू नका असं कोणीही सांगू शकत नाही. पीसी अलेक्झांडर किंवा राज्यपाल जमीर यांनी तर महाराष्ट्राच्या एकेका जिल्ह्याचा दौरा केला आहे. मग त्यावेळी हे विषय का आले नाहीत, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.

दरम्यान, राज्य सरकारला कोणतीही पूर्वसूचना न देता या बैठका होत आहेत. ही सरकारी कामात ढवळा ढवळ आहे. राज्यपालांकडून राज्यात सत्तेची दोन केंद्र असल्याचं भासवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली असल्याचं असंही नवाब मलिकांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

मुंबई लोकल सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलं ‘हे’ विधान

आभाळाएवढी कामगिरी पण कर्णधाराचे पाय जमिनीवर; कांस्य पदक कोव्हिड योद्ध्यांना समर्पित

कोरोनाचे नियम पाळा आणि खूप शाॅपिंग करा – अमृता फडणवीस

अनुष्कासारखी जोडीदार मिळणं यापेक्षा मोठं भाग्य नाही- विराट कोहली

बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळा- अमोल कोल्हे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More