महाराष्ट्र मुंबई

गुपकर आघाडीत काँग्रेसही सहभागी, देशासमोर काँग्रेसला उघडं पाडू- देवेंद्र फडणवीस

मुंबई | जम्मू-काश्मीमध्ये पुन्हा कलम 370 लागू व्हावं, यासाठी तेथील अनेक पक्षांचं एकत्रिकरण झालं आहे. या गुपकर आघाडीत काँग्रेसदेखील सहभागी झाली आहे. काँग्रेसला मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही ज्या आघाडीत सामील झाले आहेत त्याचा अजेंडा तुम्हाला मान्य आहे का?, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

फारुक अब्दुल्ला यांचा अजेंडा हा चीनच्या मदतीने कलम 370 पुन्हा लागू करण्याचा आहे. ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जाते असे नेते चीनच्या मदतीने कलम 370 लागू करण्याबाबत भाष्य करतात, याचं मला आश्चर्य वाटतं, असं फडणवीस म्हणाले.

काश्मीरमध्ये पीडीपी जोपर्यंत आमच्यासोबत होती तोपर्यंत भारताच्या तिरंगाचा अपमान करण्याची त्यांची हिंमत झाली नाही. आता ते तिरंग्याचा अपमान करत असाताना काँग्रेस त्यांच्यासोबत जात आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी यावर उत्तर द्यावं, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

मेहबुबा मुफ्ती राष्ट्रीय झेंडा काश्मीरमध्ये लागू देणार नाही, अशाप्रकारचे वक्तव्य करतात. अशा लोकांच्या आघाडीत काँग्रेस सहभागी होत असेल तर आम्ही रोज काँग्रेसला प्रश्न विचारु. देशासमोर काँग्रेसला उघडं पाडण्याचं काम करु, अशी टीका फडणवीसांनी केलीये.

महत्वाच्या बातम्या-

वीजबिल माफ करा, अन्यथा रस्त्यावर उतरु- रक्षा खडसे

वीज बिलात सूट द्या अन्यथा… तृप्ती देसाईंचा महाविकास आघाडी सरकारला इशारा

“आम्ही विधान परिषदेच्या सहाच्या सहा जागा जिंकणार, कुणी पलायन केलं तरी पक्षाला फरक पडत नाही”

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस!

शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी भाजपची नीती आहे- विजय वडेट्टीवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या