नागपूर महाराष्ट्र

सरकारला कंटाळून डीजीपींनी प्रतिनियुक्तीवर जाणं भूषणावह नाही- देवेंद्र फडणवीस

File Photo

नागपूर | राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांची CISF च्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली. यावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

राज्य सरकारच्या कारभाराला कंटाळून डीजीपी केंद्रात प्रतिनियुक्तीवर चालले आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. छोट्या छोट्या कामांतही सरकारचा हस्तक्षेप वाढत चालला आहे, असा आरोप फडणवीसांनी केलाय.

राज्यात पहिल्यांदाच पोलीस महासंचालकांना विश्वासात न घेता पोलीस विभागाचा कारभार चालला आहे. त्यामुळेच सुबोध जैस्वाल यांनी नाराज होऊन प्रतिनियुक्ती मागितली होती. ती केंद्र सरकारने स्वीकारली आहे. यामुळे राज्य सरकारने समजून घेतलं पाहिजे की पोलिसिंग गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येत असलं, तरीही पोलीस विभागाला स्वायत्तता दिली आहे, असा टोला फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला.

राज्यात पहिल्यांदाच असं घडलंय की सरकारच्या कारभाराला कंटाळून पोलीस महासंचालक गेले. पोलीस विभागाच्या मनोबलावर याचा परिणाम होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

पुणेकरांच्या आनंदावर विरजण; रात्री 11 नंतर मिळणार नाही खाद्यपदार्थांची घरपोच डिलिव्हरी

मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे भव्य कलादालन साकारा- उद्धव ठाकरे

राज्यातील लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढला!

पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभे राहतो पण…- रोहित पवार

खळबळजनक! काँग्रेस नेत्यासह पुतण्याची गोळ्या झाडून हत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या