मुंबई | राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये कलगितुरा रंगला आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. आज गडचिरोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. याचं नेतृत्व माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendr Fadanvis) यांनी केलं. याचवेळी बोलताना फडणवीसांनी सरकारला लक्ष केलं आहे.
कोरोनाच्या काळात दुर्देवाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना 5 हजार रूपयांची मदत करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. मात्र, हे सरकार इतकं नालायक निघालं की, वेश्यांना द्यायचे पैसे त्यांनी आपल्या नातेवाईकांना दिले, अशा घणाघात फडणवीसांनी केला आहे.
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला (Mahavikas Aghadi) शेतकऱ्यांपेक्षा बेवड्यांची चिंता जास्त आहे, या सरकारने विदेशी दारूवरचा कर कमी केला पण वीजबील माफ केलं नाही, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सामान्यांना धोका देणाऱ्या सरकारला वठणीवर आणणार. 2024 साली राज्यात भाजप एकहाती सत्ता प्राप्त करणार, असंही फडणवीसांनी म्हटलं.
थोडक्यात बातम्या –
कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगाची चिंता वाढवली, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
“संजय राऊत जो शब्द वापरतात तो शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल”
“महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांपेक्षा बेवड्यांची चिंता जास्त”
प्रवीण दरेकरांची पोलिसांकडून तीन तास चौकशी, बाहेर येताच दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल
“मनसे बिनबुडाची झालीये, तिला बुडही नाही आणि शेंडाही नाही”
Comments are closed.