पुणे महाराष्ट्र

“पुण्याकडे राज्याची तिजोरी आहे, त्यामुळे आता चिंता करायची गरज नाही”

पुणे | पुण्याचे प्रश्न मार्गी लावताना आता चिंता करायची गरज नाही. कारण राज्याची तिजोरीच पुण्याकडे आहे, अशी मिश्किल टिपण्णी राज्याचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे 15 लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चा ऑनलाईन लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

पुणे शहर किंवा पिंपरी चिंचवड येथील वाढत्या लोकसंख्येचा भार शेती क्षेत्राला कदापि पेलवणारा नाही. पाणी हे जरी इकॉनॉमी कमोडिटी असले तरी त्याचा सर्वार्थाने योग्य वापर होणे गरजेचे आहे, असं फडणवीस म्हणाले.

पुण्याची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. साडे पाच टीएमसी पाण्याची गरज असणाऱ्या पुणे शहराला आता साडेअठरा टीएमसी पाणी लागत आहे. जवळपास दोन लाख एकराला बारा महिने पुरेल एवढे पाणी पुणेकरांना देण्यात येत आहे. त्यात उपकार करत नाही ती शहराची आवश्यकता आहे, असं अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

भीमा-कोरेगावची जागा ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन लढा लढणार- नितीन राऊत

अभिनेता सोनू सूदचा कंगणाला अप्रत्यक्षपणे टोला; म्हणाला…

हिंदू असेल तर तो देशभक्त असायलाच हवा- मोहन भागवत

गूड न्यूज! भारताकडून सीरमच्या कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी

वर्षाचा पहिला दिवसच ठरला शेवटचा; काळजाचा थरकाप उडवणारी घटना!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या