बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकरांनी पूरग्रस्तांसोबत केलं जेवण!

मुंबई | भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर हे सातारा जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहे. त्यांनी आज साताऱ्यातील पाटण तालुक्यात आंबेघर आणि मोरगिरीमधील पूरग्रस्त गावकऱ्यांची भेट घेतली.

आंबेघर दुर्घटनेनंतर तिथल्या लोकांना या हायस्कूलमध्ये ठेवण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी शाळेत जाऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकरांनी दरडग्रस्तांसोबत खाली बसून शाळेतच जेवण केलं. जे जेवण पूरग्रस्तांसाठी देण्यात येतं, त्यातीलच जेवण फडणवीस आणि दरेकर यांनी स्वत:ही खाल्लं.

हे नुकसान मोठं आहे. सर्वांचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे. शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. नव्याने घर बांधून त्यांना जागा द्यावी लागेल. त्यांना त्यांची पसंती पाहून जागा द्यावी लागेल. अशा घटनांच्या वेळी मिळणारी मदत तोकडीच असते. पण त्यांना वाढीव मदत मिळणं अपेक्षित आहे. तात्पुरती नाही तर शक्य ती मदत परमनंट करावी लागेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

“बरेच दिवस अच्छे दिनची वाट पाहिली, आता सच्चे दिन दाखवण्याची गरज”

…म्हणून अमेरिका भारताला करणार तब्बल ‘एवढ्या’ कोटी डाॅलरची मदत

रश्मी शुक्ला यांचा मोठा गौप्यस्फोट; ‘त्यावेळी सरकारी आदेशाने…’

मुंबई लोकल सामान्यांसाठी सुरू होणार?, राजेश टोपेंचं सुचक वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींची टि्वटरवर कमाल; फॉलोअर्सची संख्या 7 कोटींवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More