बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मध्यरात्री देवेंद्र फडणवीस पोलीस अधिकाऱ्यांवर भडकले, पाहा संपूर्ण व्हिडीओ

मुंबई | दमणच्या ब्रूक फार्मा या कंपनीकडे तब्बल 60 हजार रेमडेसिव्हीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. विशेष गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी याच कंपनीत जाऊन महाराष्ट्रासाठी काही इंजेक्शन्स बूक केली होती.  मात्र शनिवारी मुंबई पोलिसांनी अचानक ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतलं.

राजेश डोकनिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात धाव घेत याविषयी जाब विचारला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस पोलीस अधिकाऱ्यांवर भडकल्याचं पहायला मिळालं. यावेळी फडणवीस यांच्यासह विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार पराग अळवणी, आमदार प्रसाद लाडही सोबत होते.

भाजप नेत्यांनी पोलीस स्थानकात दाखल होत आक्रमक भूमिका घेतली. या सर्व घटनाक्रमानंतर राजेश डोकनिया यांना सोडून देण्यात आलं. यानंतर देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकावर गंभीर आरोप केला आहे.

ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. तुम्ही या इंजेक्शन्सची निर्यात कशी करु शकता, असा जाब त्यांनी डोकानिया यांना विचारला. त्यानंतर राजेश डोकानिया यांच्या घरी पोलीस पाठवून त्यांना उचलून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ठाकरे सरकार दबावाचे राजकारण खेळत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

वाहनांसाठी आता कलर कोड, मुंबई पोलीस आयुक्तांच्या सूचना

रेमडेसिवीर उत्पादकाला पोलिसांनी उचललं, विरोधी पक्षनेते लगेच पोहोचले पोलीस स्टेशनमध्ये

महिला PSIवर सहकारी APIकडून 8 वर्षे बलात्कार, महाराष्ट्रातील घटनेनं खळबळ

कोरोना लस घेतल्यावर रक्ताच्या गुठळ्या?, WHO ने केला मोठा खुलासा

राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More