बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांनी केली आठ जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आठ जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. अमरावती, पालघर, भंडारा, गोंदिया, हिंगोली, वर्धा, बुलढाणा, आणि गडचिरोली या आठ जिल्ह्यांचे पालकमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत.

कृषीमंत्री अनिल बोंडे यांची अमरावतीचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालघरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राज्यमंत्री परिणय फुके यांची भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर राज्यमंत्री अतुल सावे यांची हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, कामगार मंत्री संजय कुटे यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-नितेश राणेंची अधिकाऱ्यावर चिखलफेक; चंद्रकांत पाटलांनी घेतली कुटुंबाची भेट

-राहुल गांधींवर आरोप करत गुजरातमधल्या दोन आमदारांचा राजीनामा; काँग्रेसला धक्का

-त्या खेकड्यांवर 302 चा गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी युवकची मागणी

-“प्रकाश आंबेडकरांची भूमिका आणखीनही भाजपला मदत करण्याचीच”

माजी सनदी अधिकाऱ्यांचा लोकसभा निवडणुकीबाबत सगळ्यात मोठा गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More