शरद पवार, विलासराव देशमुखांना जमलं नाही; ते देवेंद्र फडणवीसांनी ‘करुन दाखवलं’!

मुंबई | महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाराष्ट्राच्या 16 माजी मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी मागं टाकलं आहे.

दिवंगत वसंतराव नाईक वगळता सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान देवेंद्र फडणवीसांच्या नावावर जमा झाला आहे. त्यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांना मागे टाकले. 

देवेंद्र फडणवीस यांनी 6 डिसेंबर 2018 रोजी मुख्यमंत्रिपदाचे 1 हजार 498 दिवस पूर्ण केले.

वसंतराव नाईकांनंतर सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावे नोंदवला गेला आहे. ते आपला 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतील, असं मानलं जातंय. 

महत्वाच्या बातम्या-

-कोर्टाच्या आदेशापुढे संभाजी भिडे नमले; अखेर नाशिक न्यायालयात हजेरी

-होय, भाजपने गरज पडेल तसा माझा वापर करुन घेतला- एकनाथ खडसे

-जगाला हेवा वाटावा असा विक्रम पाकिस्तानी गोलंदाजाच्या नावावर!

-‘वसुंधरा राजे खूप जाड झाल्या आहेत, त्यांना आराम द्या’ वक्तव्यावर शरद यादवांच स्पष्टीकरण

-मलाही लग्न करुन सुखी संसार थाटायचा होता, पण… – कतरिना कैफ