बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वाझेला कामावर रुजू करून घेताना सरकार काय झोपलं होतं का?”

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचे पत्र सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तसेच यावरून विरोधकांनी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढल्याचं पाहायला मिळत आहे.

नुकतीच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करून घेतानाचे नियम गृहमंत्र्यांना माहिती नाही का? वाझेला कामावर रुजू करून घेताना सरकार काय झोपलं होतं का? तसेच, निलंबित अधिकाऱ्याला पुन्हा पोलिस दलात भरती केल्यानंतर महत्त्वाच्या पदावर ठेवता येत नाही आणि महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास त्याच्याकडे सोपवता येत नाही. एवढा साधा नियम गृहमंत्र्यांना माहिती नाही? असा प्रश्न विरोधी पक्ष नेत्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

परमबीर सिंह यांच्या समितीने सचिन वाझेला कामावर रुजू करून घेतलं हे सत्य आहे. पण, त्यासाठी गृहमंत्र्यांचा आदेश होता. हे त्यामागचं सत्य असल्याचंही फडणवीस यांनी बोलून दाखवलं. तसेच केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ही त्यांनी या माध्यमातून त्यांनी केली.

अनिल देशमुख यांची निष्पक्ष चौकशी करायची असेल तर त्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणं गरजेचं आहे. गृहमंत्री या पदावर राहून निष्पक्ष चौकशीची अपेक्षा ठेवताच येणार नाही. मुळात गृहमंत्री या पदावर राहून चौकशी होऊच शकत नाही. त्यामुळे, गृहमंत्र्यांनी पदाचा त्वरित राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

थोडक्यात बातम्या – 

“…त्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी राजीनामा दिला होता का?”

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…

सरकारच्या निर्मात्यांना सरकारची बाजू घ्यावीच लागते- देवेंद्र फडणवीस

“साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करून सरकारं पाडायची, हाच भाजपचा उद्योग”

लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडू नका; स्वत: ठोकर खाल्लेल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More