बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पत्रकारांवर दंडुकेशाही, विधानसभेत लोकशाहीची हत्या’; विरोधी पक्षनेते आक्रमक

मुंबई | महाराष्ट्र विधानसभेचा पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशीही चांगलाच गदारोळ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षाने सरकार विरोधात प्रतिविधानसभा विधीमंडळ परिसरातच भरवली.

दरम्यान, तालिका अध्यक्ष म्हणून तात्काळ भास्कर जाधव हे खुर्चीवर बसले आणि त्यांनी या प्रतिविधानसभेवर कारवाई करण्याचे व माध्यमांचं प्रक्षेपण रोखण्याचे आदेश दिले. पोलिसांनी प्रति विधानसभा सुरू असताना तेथील माईक काढून घेतला व माध्यमांनाही प्रक्षेपण करण्यास थांबवलं.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात बोलताना सरकारने पत्रकारांवर दंडुकेशाही सुरू केली आहे आणि विधानसभेत लोकशाहीचा हत्या होत असल्याचा आरोप राज्य सरकारवर केला आहे.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांचा प्रक्षेपण रोखण्याची विनंती अधिवेशनातील तालिका अध्यक्षांना केली होती. त्यानुसार भास्कर जाधव यांनी तात्काळ ही प्रतिविधानसभा थांबवण्याचे आदेश दिले.

 

थोडक्यात बातम्या – 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More