राज्याच्या इतिहासात ‘हे’ कधीच घडलं नाही, फडणवीस एकमेव जे…

Bjp

Devendra Fadnavis | महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार सहाव्यांदा शपथ घेणार आहेत. अजित पवार यांच्यासोबत एकनाथ शिंदे सुद्धा उपमुख्यमंत्री होणार आहे.

राज्याच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री

सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्याच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री आहेत.

लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर यंदा महाविकास आघाडीची सत्ता येणार असे अंदाज येत असताना 288 पैकी 132 जागांवर भाजपने कमळ फुलवलं. या विजयामागे अनेक कारणं असली तरी देवेंद्र फडणवीसांच्या चाणक्यनीतीमुळे भाजपला इतकं मोठं यश मिळाल्याचं बोललं जातं. नेतृत्व कौशल्यासाठी आणि व्यावहारिक दृष्टिकोनासाठी ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आहे.

Devendra Fadnavis यांची कारकिर्द

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय करिअरला तरूण वयातच सुरुवात झाली. 2014 च्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. यावेळी ते 44 वर्षांचे होते. 2014 ते 2019 पर्यंत त्यांनी राज्याचा कारभार सांभाळला.

शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर 2019 ला अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. पण हे सरकार 80 तासात पडलं. पण पुन्हा शिंदेसोबत आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडत उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारली. आता पुन्हा ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

अजितदादांच्या राष्ट्रवादीने किती मंत्रीपदं मागितली? बड्या नेत्यानी संख्याच सांगितली

“एकनाथ शिंदेंना डावलून कुणी काही करत असेल, तर…”; ‘या’ नेत्याचा थेट इशारा

हवामान विभागाने सावध राहण्याचं केलं आवाहन! यामागचं कारण काय?

शपथविधीआधी वर्षावर हायव्होल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! PM किसानचा 19 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .